कोरोना विषाणू आणि कोंबड्यांचा संबध नाही - पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

पुणे : नोव्हेल करोना विषाणु प्रादुभार्वाशी कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा कोणताही संबध नाही. कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने आहारासाठी पुर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. तसेच याबाबत अफवा परविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नोव्हेल करोना विषाणूबाबत समाज माध्यमातील अफवासंदर्भात पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, शास्त्रज्ञ डॉ.बी. एन.तांदळे, वेंकीजचे व्यवस्थापक डॉ. प्रसन्ना पेडगावकर, ससून रूग्णालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन आयुक्त सिंह म्हणाले, राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाशी लाखो शेतकरी बांधवाचे चरितार्थ व हित निगडीत आहे मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत: कुक्कुटपालन उद्योगाशी संलग्न आहेत. तसेच कुक्कुट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. नोव्हेल करोना विषाणु हा सांसर्गिक असून, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमीत होतो.

तथापि, कुक्कुट पक्ष्यांमधील करोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमीत होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये नोव्हेल करोना विषाणु संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून – शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.

 

Source: Punelive24.com

Newsletter

Subscribe to our newsletter. Don’t miss any news or stories.

We do not spam!

Search